स्पंदने कविता -- सुधीर वैद्य
--------------------------------------------------------------------------------
दिवाळी

"आज दिवाळी आहे , आज दिवाळी"
पेपर आला, दुध आले, कचरेवाला आला, laundry वाला आला,
नळाला आजपण पाणी आहे.

"आज दिवाळी आहे , आज दिवाळी"

रिक्षा, बस चालू आहे. ट्रेनला पण गर्दी आहे.
तिकिटाला प्रचंड रांगा आहेत.

"आज दिवाळी आहे , आज दिवाळी"

बांधकाम चालू आहे, पोलीस सतर्क आहेत.

अग्निशामक दल सज्ज आहे. सीमेवर सैन्य तैनात आहे.

"आज दिवाळी आहे , आज दिवाळी"

हॉटेल , दुकाने आज उघडी आहेत.

गर्दीमुळे प्रवासात थोडा त्रास आहे.

पण पांढरपेशा कपाळावर आठी आहे.

"आज दिवाळी आहे , आज दिवाळी"

पांढरपेशा सोडून सर्व सेवाकर्मी कामावर हजार आहेत.

त्यांची पण दिवाळी आहे हे ते सोयीस्कर पणे विसरत आहेत.

सुधीर वैद्य

२०-१०-२०११

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

जाहिरात

जाहिरातीसाठी product होते Necklace

Model ला मात्र व्हावे लागले Topless

लोकांना कळेना प्रथम काय बघावे?

Necklace ,  Topless , कि Topless  वरील Necklace

मित्रानो तुम्हाला काय वाटते कि Model बघून विक्री वाढते?

कि माणसांच्या गरजेवर आणि त्याच्याकडील पैशावर ती अवलंबून असते?

विषयाचा अभ्यास होणे गरजेचे आहे.

Ph .d  च्या प्रभंदासाठी विषय उत्तम आहे.

जाहिरातीवर खर्च थोडा कमी केला तर वस्तूची किमत कमी करता येईल

व सामान्य माणसाला ती घेता येईल आणि विक्री वाढेल.

पण पण हे सांगणार कोण आणि लक्षात घेणार कोण?

जाहिरात केली कि Model  हि खुश, Advertising कंपनी हि खुश आणि हो निर्माता हि खुश

पण ग्राहक मात्र नाखूष.

जय हो Marketing  Strategy

सुधीर वैद्य

०१-११-२०११

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

गणपती बाप्पा कडे मागणे - साकडे

गणेश चतुर्थी ला गणपती बाप्पा मखरात विराजले,
पण आरती झाल्यानंतर जरा कंटाळले.

हळूच म्हणाले उंदीर मामाला .....
भक्तांचे मागणे - साकडे एकून किटले कान,
ह्याच साठी हे करतात का माझा मान?

मी नवसाला पावतो असे ह्यांना वाटते,
पण ह्यांच्याच प्रयत्नाने यश त्यांना मिळते.
क्रेडीट मात्र मला देतात,
आपल्याच प्रयत्नांना कमी लेखतात.

सगळेच मागितलेले मी देत नाही,
तरी मिळालेल्याची किमत  ह्यांना नाही.

आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होत नाही पण
मिळालेल्या गोष्टी वर प्रेम करावे हे ह्यांना कळत नाही.

मागण्या एकूण बाप्पा लागले सांगू ....
कि भक्तानो प्रामाणिक प्रयत्न करत राहा.
मिळेल ते फळ स्वीकारत राहा.
वयाच्या आधी आणि लायकी पेक्षा जास्त काही मिळत नसत.....

पण आरती च्या आवाजात बाप्पा चे शब्द जात होते विरून,
भक्त आपल्या गायकीत गेले होते रमून.

बाप्पा दर वर्षी येत राहतील,
भक्त मागणे - साकडे घालत राहतील,
आरतीच्या आवाजात बाप्पाचे  बोलणे विरून जाईल,
नवस मात्र बोलले जातील,
दर्शनच्या रांगा वाढत जातील,
कर्म कांडात भक्त अडकत जातील,
पण बाप्पा प्रतेयक माणसात लपला आहे हे मात्र विसरून जातील.


सुधीर वैद्य

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

प्रवास

प्रवास म्हणजे प्रवास असतो.
तुमचा आमचा सेमच  असतो.
पण माणसागणिक रस्ता मात्र बदलत असतो.
प्रवास म्हणजे प्रवास असतो.

आयुष्य हाच एक प्रवास असतो -
जन्मापासून मृत्यू पर्यंतचा.

आयुष्याचा प्रवास ट्रेनच्या प्रवासा सारखा करायचा असतो.
सहप्रवासी निवडण्याचे स्वातंत्र्य नसलेला हा प्रवास असतो.
आपले कुटुंबीय आपले सहप्रवासी मानावे.
म्हणजे प्रवास सुखाचा होतो.

स्टेशन आले की उतरतो सहप्रवासी
आपल्याला मागे टाकून.
आयुष्यातही हेच होते.
पण आपण जातो चक्रावून.

प्रवासाचे सुख असते प्रवासात.
नसते मुक्कामाच्या स्थानात.

रात्रीची झोप हा हि मृत्यूच असतो.
पण पहाट मात्र नवीन जन्मच असतो.

अजून किती वेळा पहाटे जाग येईल माहित नाही.
देव आमची विनंती मानतच नाही.
आयुष्यात  काही कमावयाचे राहिले नाही.
अजून जगतो म्हणून काही बाही करतो आहे.

सुधीर  वैद्य

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

हास्य


हसणार्याने  हसत जावे.
रडणार्याने रडत जावे.
बघणार्याने बघत जावे.
बघता बघता हसू - आसूचे अवलोकन करावे.


हल्ली हास्याचे प्रसंग शोधावे लागतात.
मात्र रडण्याचे प्रसंग रोजच येतात.

हास्याचे पण प्रकार असतात. खो-खो, हि-हि, हा-हा
मित्रानो आपले हास्य निर्मल ठेवा.
माणुसकीचा झरा वाहता ठेवा.

हास्य हे हास्य च असते असे नाही.
रडणे हे रडणे च  असते
असे नाही.
रडू शकत नाही म्हणून हसावे लागते.
हसता हसता रडावे लागते.

वेदनेतून येणारे रडू लपविण्यासाठी येते हसू.
अपेक्षा पूर्ती नंतर येती आसू.

हास्या नंतर रडणे येते.
रडण्या नंतर हसणे नशिबी असते.
हेच तर जीवनाचे चक्र असते.

वेदनेच्या छायेत मी मोठा झालो.
वेदनेची च वेदना  झालो.
आणि वेदनेलाच आले खुदकन हसू.


सुधीर वैद्य
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पाऊस

पाऊस म्हणजे पाऊस असतो.
निसर्गाचा सेमच असतो पण  प्रतेय्काचा वेगळा असतो.

पाऊस सुखाचा असतो.
पाऊस दुःखाचा असतो.
पाऊस प्रेमाचा असतो.

जसा जास्त पावसाचा कंटाळा येतो.
तसाच अति सुखाच्या व अति दुःखाच्या पावसाचा कंटाळा येतो.
पण आपला काहीच इलाज नसतो.
कारण पाऊस आणि सुख - दु:ख, निसर्ग आणि नशिबा वार अवलंबून असत.

आपण मात्र सोसायच असत.
दिवस पालटण्याची वाट बघण असत.
भोगणं फक्त आपला असत.
बाकी सगळ झुठ असत.

संकटात संधी शोधण असत.
सुखात पाय जमिनीवर ठेवण असत.
एवढच आपल्या हातात असत.

पाऊस एकदिवस थांबतोच.
सुख - दु:खा साठी सुद्धा हाच नियम असतो.
पण आपल्याला मात्र प्रत्येक गोष्टीची घाई असते.
आणि हेच आपल्या दु:खाच कारण असत.

वयाच्या आधी आणि  नशिबा पेक्षा जास्त मिळत नसत.
पण ह्याच भान मात्र आपल्याला नसत.

पाऊस, हिवाळा, उन्हाळा हे निसर्गाच चक्र आहे.
सुख, दु:ख  हे नशिबाच चक्र आहे.
निसर्गाची साठ चक्र मी बघितली आहेत.
म्हणूनच ह्या पावसाची कविता तुम्हाला ऐकवतो आहे.


सुधीर वैद्य


-------------------------------------------------------------------------------------------------------------------

अपघात

अपघात म्हणजे अपघात असतो.
प्रत्येकाचा वेगळा असतो.

अपघात शरीराचा असतो.
अपघात मनाचा असतो.

अपघाताच्या जखमा मनावर कोरल्या जातात.
शरीरावरच्या लवकरच पुसल्या जातात.

अपघाताने माणसे जवळ येतात.
नाहीतर दुरावतात.

एकाचा अपघात दुसर्याचा फायदा असतो.
त्याला कोणाचाच इलाज नसतो.

अपघातातून शिकायचं असत.
पण याच भान प्रत्येकाला नसत.

बरेच अपघात  चुकीने होतात.
पण शिक्षा मात्र दुसरेच भोगतात.

अपघाताच ग्रहमान समजू शकत.
पण तरुण मन ह्यावर विश्वास ठेवण कठीणच असत.

अपघात टाळायचा प्रयत्न करा.
जगा आणि जगू द्या.

मित्रानो मी हि अपघाताची शिकार झालो आहे.
म्हणूच हि कविता तुम्हाला  ऐकवतो आहे.


----------------------------------------------------------------------------------------------------

दु:ख


दु:ख हे दु:ख असत.
तुमच आमचं सेम नसत.

आमचं   दु:ख  जड असत.

तुमच  दु:ख हलक असत.

मित्रानो अस काही नसत.

दु:ख हे दु:खच असत.

दु:ख भोगून संपवायचं असत.

आपल्याला का म्हणून विचारायचं नसत.
दुसरयाल का नाही म्हणून झुरायचं नसत.

दु:ख हे स्वीकारायच असत.

दु:खाला मित्र करायचं असत.
मागील जन्माचे दु:ख ह्या जन्मी भोगायचं असत.
मग पुढील जन्मी सुखच सुख असत.

दु:ख देऊ नको म्हणून देवाला सांगायच नसत.

तर दु:ख भोगायला बळ दे म्हणून सांगायच असत.

दु: खा नंतर सुख येईल अस मानायचं असत.

सुखानंतर  दु: ख येईल म्हणून खंतावायच नसत.

दु: खात वाटेकरी करायचे नसतात कारण

प्रत्येकाला दु:ख असतात.

सांगता येणारं दु:ख चांगल असत.

न सांगता येणारं दु:ख कठीण असत.

सुखा बरोबर दु:ख येतचं असत.

पण आपल्याला ते समजत नसत.
म्हणून अनावश्यक सुख नाकारायच असत.
म्हणजे दु: खाच पारड हलक होत असत.

सुखाची मजा दु:ख शिकवते.

आयुष्यात दु:ख नसल्यास जीवन बेचव होते.

दु:ख माझा बालपणी पासूनचा मित्र आहे.

म्हणून तर दु: खाची गोष्ट तुम्हाला सांगतो आहे.

सुधीर वैद्य

-----------------------------------------------------------------------------------------

सुख

सुख म्हणजे सुख असत.

तुमच आमच सेम नसत.
आमच सुख मोठ असत.
तुमच सुख लहान असत.

खरे  तर सुख कशात असत हेच माहित नसत.

सुख वस्तू मिळण्यात नसत.
सुख वस्तू न मिळण्यातहि  नसत.

सुख हे मनात असत.

मनातून चेहऱ्यावर ओसंडत.

सुखा नंतर दु:ख येत.

बाजार भावाच हेच तर चक्र असत.

सुख प्रवासाच्या शेवटी नसत.

सुख प्रवासातच शोधाव लागत.

सुखाने हुरळून जायचं नसत.

सुखा नंतर दु:ख येणार म्हणून मन हळव करायचं नसत.
सुखा बरोबर दु:ख येत हे भान सोडायचं नसत.

सुखात सगळ्यांना सामील करायचं असत.

सुखाची व्याख्या नसते. प्रत्येकच सुख वेगळ असत.

सुख पचवायच असत.

सुख हे अल्प जीवी असत.
चिरंतन सुख मिळवाव लागत.
सुख ओळखाव लागत.

मी दु: खाला सुख म्हटले .

घडाळ्याचे काटे उलटे फिरवले आणि मलाच हसू आले.

सुधीर वैद्य

--------------------------------------------------------------------------

आयुष्य

आयुष्य म्हणजे आयुष्य असत.

प्रत्येकच वेगळ असत.
आयुष्य म्हणजे एक खेळ असतो.
लहानपणी सर्कशीत बघितलेला असतो.

आयुष्य म्हणजे पाच चेंडूचा खेळ असतो.

विदुषक फेकतो चेंडू हवेमध्ये.
आरामात झेलतो हातामध्ये.

पहिला चेंडू असतो शिक्षणाचा.

दुसरा चेंडू असतो नोकरी - व्यवसायाचा.
तिसरा चेंडू असतो कुटुंबाचा.
चौथा चेंडू असतो तब्बेतीचा.
पाचवा चेंडू असतो मित्र - करमणुकीचा.

सर्व चेंडू हवेमध्ये फेकत जावे.

जमिनीवर न सांडता झेलत जावे.
जो हे करील तो सुखी होईल.
अन्यथा दु:खी होईल.

आयुष्याच्या खेळात सर्व चेंडू नसल्यास होतो विचका.

मग आयुष्याचा होतो पचका.
मित्रानो पाच चेंडू नि खेळयची सवय करा.
आपल आयुष्य सार्थकी लावा.

सुधीर वैद्य

------------------------------------------------------------------------------------

प्रेम

प्रेम म्हणजे प्रेम असत

तुमच आमच सेम नसत
आमच प्रेम खर असत
तुमच प्रेम बेगडी असत

प्रेमाची एकच व्याख्या नसते

तुमची आमची व्याख्या नक्कीच वेगळी  असते

तुमची प्रेमाची व्याख्या शारीरिक असते

आमची प्रेमाची व्याख्या मात्र व्यापक असते.

आम्ही कामावर प्रेम करतो

आम्ही कामाने मिळणाऱ्या समाधानावर प्रेम करतो
आम्ही निसर्गावर प्रेम करतो व त्याचा मान राखतो
आम्ही आई वडिलांवर प्रेम करतो
आम्ही कुटुंबावर प्रेम करतो
आम्ही मित्रांवर प्रेम करतो
आम्ही संकटावर सुद्धा प्रेम करतो
आम्ही देवावर प्रेम करतो
आम्ही शरीरावर सुद्धा प्रेम करतो पण तो शरीर धर्म असतो.

आमच्यावर मात्र कोणीच प्रेम करत नाही

कारण आमच प्रेमच  कोणाला समजत नाही.
हेच आमचं दु: ख  आहे मित्रानो

म्हणूनच म्हणतो की

तुमची आमची व्याख्या नक्कीच वेगळी  आहे 
आमची प्रेमाची व्याख्या व्यापक आहे
ह्याच मस्ती मध्ये मी दंग आहे.

सुधीर  वैद्य

--------------------------------------------------------------------------

ध्येय

ध्येय म्हणजे ध्येय असत

तुमच आमच सेम नसत

आमचं ध्येय लई भारी असत

तुमच ध्येय ...........

माणसागणिक ध्येय बदलत असत आणि

माणसाचं ध्येय क्षणो क्षणी बदलत असत

ध्येय दिवसाच असत, ध्येय अल्प जीवी असत.

ध्येय आयुष्याच असत.

ध्येयाची एक मालिका असते

प्रयत्नाने ती गुंफावी लागते.

दिवसाच ध्येय ७.१२ ची ट्रेन मिळवणं असत

मग सीट मिळवण असत,
ट्रेन मधून लवकर उतरून muster गाठणं असत.
पण ऑफिसात काम करायचं ध्येय ठरलेल नसत.
त्यासाठी vitamin M ची मात्रा असते.

मित्रानो कामातला आनंद मिळवायचा असतो

पैसा पाठोपाठ येतच असतो.
पैसा मिळवणे हे ध्येय असण्याची गरजच नसते
प्रामाणिक पणे काम करण्याचीच गरज असते.

आम्ही आयुष्यात शिक्षणाचा घेतला ध्यास, आणि

विद्यार्थी दशेचा घेतला आनंद
शिकलेले उधळून टाकले बेधुंद

ध्येय ठरवताना विचार करावा अंगभूत गुणांचा व त्रुटींचा

चुकीचे ध्येय ठरवले तर होतो विचका
मग काय आयुष्याचा पचकाकच पचका

आयुष्यातील संकटांनी शिकवले शहाणपण

ध्येय ठरत गेले आपले आपण.

आज मी उभा आहे निवृतीच्या
उंबरठ्यावर.
काय कमावले आणि काय गमावले चा हिशेब मांडत संगणकावर

सुधीर  वैद्य

---------------------------------------------------------------------------------------

वेदना

वेदना म्हणजे वेदना असते

तुमची आमची सेमच  असते

वेदना मनाची असते

वेदना शरीराची असते

माझी वेदना आहे नि:शब्द

तिला साथ देण्या मी शोधतो आहे शब्द
म्हणूनच करतो आहे हा काव्य प्रपंच

वेदना मला का म्हणून विचारले नाही

दुसऱ्याला का नाही म्हणून दु: खी झालो नाही

वेदनेचे उमटले वळ

भोगायला मिळाले त्यातूनच बळ
वेदनेने केले घायाळ
कारण माझी वेदना होतीच तशी खट्याळ

वेदनेला स्वीकारत गेलो

भोगून बाकी शुन्य करायला गेलो.
पण ते जमलेच नाही
तीच वेदना घेऊन मी निघणार आहे लांबच्या प्रवासाला
अशी वेदना कोणाला देऊ नको हे देवाला सांगायला

वेदना इतकी झाली की त्याचेच झाले हसू

मात्र माझ्या डोळ्यात होते आसू

वेदनेच्या सावलीत मी मोठा झालो

वेदनेचीच  मी वेदना झालो.

सुधीर  वैद्य

-----------------------------------------------------------------------

होळी

होळी म्हणजे होळी आहे.
तुमची आणि  आमची सेमच आहे.
कारण जेवायला पुरण पोळी आहे. :)

होळी म्हणजे होळी आहे.
पण तुमची आणि  आमची सेम नाहीये.
कारण तुम्ही खेळता होळी  रंगाने
मी मात्र रंगीत पेनाने.

पेपर  तपासता तपासता रंगांचा मांडतो खेळ.
समजत नाही कसा जातो वेळ. :)
हिशेबाच्या वह्यांवर परत रंगतो खेळ.
फी मधून होतो खर्चाचा मेळ. :) :)

बालपणी रंगांची झाली ओळख.
पण होती नुसतीच तोंड ओळख.
माहित नाही पण काळ्या रंगाचा  लागला नाद.

त्याच रंगाचा शोध घेता घेता पडता पडता वाचलो.
आणि बायकोच्या प्रेमात पडलो.
परत एकदा रंगांची झाली नव्याने ओळख.
कारण लहानपणी होती नुसतीच तोंड ओळख.

मित्रानो आज पहाटे ३ वाजता  हि कविता सुचली.
झोपेचे पार खोबरे करून गेली.
आज आहे शनिवार. न कर्त्याचा  वार. त्यातून घातवार.
पण माझा मात्र सेवेचा वार.

जेष्ठ नागरिकांना धीर देण्याचा वार.
माहित नाही धीर देता देता किती वर्षे निघून  गेली.
जाता जाता मला मात्र जेष्ट नागरिक करून गेली.

परत एकदा काळ्या रंगाचे वेध लागले आहेत.
पण जाताना पांढरया रंगाचीच साथ आहे.

आज सोसायटीत होळी आहे.
आपल्या होळी आधी किती होळ्या बाकी आहेत?

मित्रानो, कविता वाचून घाबरू नका.
सुखाच्या क्षणि मी कविता करत आहे.
माझे आत्म चरित्र तयार होते आहे.


सुधीर  वैद्य
१९-०३-२०११


---------------------------------------------------------------------------
आत्मा

प्रत्येकाकडे असतात ह्या गोष्टी
शरीर, पैसा, संपत्ती, मित्र, नातेवाईक,
पण जग सोडताना कोणीच येत नाही बरोबर

आत्मा मात्र तयार असतो
कारण तो अमर असतो
हे समजत नाही माणसाला
आणि झिडकारत राहतो आत्म्याला
------------------------------------------------------------------

मरण
मरण हे मरण असते
प्रत्येकाचे वेगळे असते.

माणूस रोजच मरतो मनाने.
यमाने नेल्यानंतर एकदाच मरतो शरीराने.
--------------------------------------------------------

बालमन

नित्य नवीन वस्तूंचा भूल भुलैया फिरत असतो.
बालमनाला भुरळ घालत असतो.

...मोठ्या माणसाला हि बालमन असते.
पण परिस्थिती मनावर दडपण आणते.

मग दुधाची तहान ताकावर भागवावी लागते.
mobile चे cover बदलून हौस भागवावी लागते.

नित्य नवीन गोष्ठी साठी मन घायाळ असते.
उपयुक्ततेचे भूत मानी असते.

आयुष्याच्या संग्रामात बालमन हरवलेले असते.
परत बालपण मिळण्यासाठी पुनंर्जन्माची आशा असते.
------------------------------------------------------------------------------

जन्म आणि मरणामध्ये एका श्वासाचे अंतर आहे
चांगल्या कामाचा मला ध्यास आहे आणि हाच माझा श्वास आहे.
---------------------------------------------------------------------------------
आपण सर्वच जण एक दिवस मरणार असतो.
म्हणून काय मुलीचे लग्न ठरले असता
यमाने अचानक माझ्या मित्राला न्यायचं असत?


--------------------------------------------------------------------------------------

पाउस

वर्षा ऋतू सुरु होतो
आकाश्यात ढग जमू लागतात
मला त्या दिवसांची आठवण देत व्याकूळ करतात.
------------------------------------------------------------

सेवा निवृत्ती

निवृत्ती हि निवृत्ती असते व्यवसायातून / नोकरीतून, सेवेसाठी.

आयुष्यभर जे समाजाने दिले ते भरभरून परत देण्यासाठी.
--------------------------------------------------------------------------------------------

अलिप्त

मी समारंभात जायचे टाळतो.

फालतू बडबड व मानपान यातून अलगद निसटतो .
--------------------------------------------------------------------------------------

आयुष्य

आपले आयुष्य हे मेणबत्ती सारख असत,
जळता जळता आठवणींच मेण जमत असत.
---------------------------------------------------------------

बदल

ऑक्टोबर गरमीला दूर सारत, हिवाळा येतो.
गार हवेची शाल लपेटून माणूस सुखावतो.
------------------------------------------------------------------

जेव्हा कार चा होर्न वाजत असतो,
तेव्हा समजावे कि वाहन चालक नवीन असतो.
------------------------------------------------------------------
निवृत्ती
आज मी उभा आहे निवृतीच्या उंबरठ्यावर.
काय कमावलं, काय गमावलं चा हिशेब मांडत कॉम्पुटर वर.
--------------------------------------------------------------------