१२३ / स्पष्टवक्तेपणा
मित्रानो, आज मी तुमच्याशी ' स्पष्टवक्तेपणा ' या विषयाबद्दल माझे विचार सांगणार आहे.
प्रथम तुम्हाला एक गोष्टच सांगतो. एक आटपाट नगर होते. त्या नगरीचा राजा शूर होता पण त्याला एषो आराम आणि चैनीची आवड होती. तशी तर एषो आराम आणि चैन हि आजच्या पिढीची मानसिक गरज झाली आहे. असो. मला वेगळीच गोष्ट सांगायची आहे. एक दिवस राजाला लहर आली कि तलम वस्त्राचे कपडे शिवावे. राज्यात दवंडी पिटली जाते व कारागिरांना आवाहन केले जाते. एखादी वस्तू मनासारखी बनवून मिळाली नाही तर राजा शिक्षा करत असे त्यामुळे प्रजा व सेवकहि कंटाळले होते. त्या नगरात दोन हुशार कारागीर राहत होते. ते राजाला धडा शिकवायचे ठरवतात. राजाची मागणी ते स्वीकारतात व एक महिन्याची मुदत मागून घेतात. दोघांना काम करण्यासाठी जागा दिली जाते. एक महिना संपतो. वस्त्रे परिधान करण्या साठी ते राजाला खोलीत बोलावतात. राजा अंगावरची वस्त्रे उतरवतो. कारागीर नवीन शिवलेली वस्त्रे राजाला घालतात. राजा खुश होतो. सेनापतीला सांगतो कि मी नवीन वस्त्रे घालून राज्यात फेरफटका मारणार आहे. योग्य ती तयारी करा. राजा रथात बसून फेरफटका मारू लागतो. सर्वे प्रजाजन भीतीने वस्त्रांची तारीफ करतात. तेव्हड्यात एक लहान मुलगा ओरडतो कि राजा तर नागडा आहे. त्याने कपडेच घातले नाहीयेत. राजा संतापतो आणि राजवाड्या कडे निघून जातो.
मुलगा स्पष्ट पणे सांगू शकला कारण त्याला परिणामांची भीती नव्हती. लहान वय असल्यामुळे कोणाला काय बोलावे याची जाण नव्हती. मित्रानो आता विचार करायची जबाबदारी आपली आहे.
जेव्हा तुमच्यावर योग्य वेळ येते तेव्हा तुम्ही स्पष्ट पणे बोलता का? विचार करा व सावकाश उत्तर द्या.
हल्ली मात्र वेगळेच चित्र दिसते. आज पालक म्हणून, नोकरीत कामाची जबाबदारी पार पाडताना आपण किती स्पष्टपणे बोलतो? पहिला विचार असतो कि समोरचा माणूस नाखूष होता कामा नये. थोडक्यात म्हणजे ' प्रिय ' वागणूक केली जाते. (समोरच्याला जे आवडते ते बोलणे. मग ते त्याच्या हिताचे नसले तरी चालेल. स्व:ताचे काही नुकसान होणार नाही ना मग झाले. दर वेळेला असे वागून चालत नाही. वाईटपणा आला तरी चालेल पण 'श्रेय ' वागणूक केली पाहिजे. (समोरच्यासाठी जे चांगले आहे ते सांगणे) आपण वरिष्ट असताना असे वागतो का? मुलांशी वागताना आपण परखडपणे त्यांच्या वर्तणुकीबद्दल, त्यांच्या दुर्गुणाबद्दल बोलतो का?
मला कल्पना आहे कि प्रत्येकजण स्पष्टपणे बोलत नाहीत. (प्रत्येकाची कारणे वेगळी असतील) पण जे स्पष्टपणे बोलतात त्यांच्यावर टीका करण्यापूर्वी स्वता:ची वागणूक जरूर आठवावी एवढीच माफक अपेक्षा आहे.
You may not say what you mean unless called for but you should always mean what you say. हा आणखीन एक प्रकार आहे. आपण जे बोलतो तसेच आपल्या मनात असले पाहिजे नाहीतर ती एक प्रकारची फसवणूक ठरेल. अर्थात व्यवहारात आपल्याला वेगळाच अनुभव येतो हे सर्वाना मान्य करावेच लागेल. आपल्या मनात असेल ते वेळ आल्यावर मात्र बोललेच पाहिजे.
कामातीलयोग्य स्पष्टवक्तेपणाची किंमत पण द्यावी लागते व त्यासाठी मनाची तयारी लहानपणापासून करावी लागते. मला हे बाळकडू वडिलांकडून मिळाले. मी स्वता:ला नशीबवान समजतो. मी नेहमीच ' श्रेय' वर्तणुकीने वागलो. आज निवृतीच्या उंबरठ्यावर उभा असताना मन:शांती मिळण्याचे हे एक महत्वाचे कारण आहे.माझ्या कुटुंबीयांनी, clients नी, मित्रांनी मला नेहमीच समजून घेतले. त्यामुळे प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचे बळ मला मिळाले.
मित्रानो,तुमचा काय अनुभव स्पष्टवक्तेपणा बद्दल?