१२२ / रंगाचे अंतरंग
आपल्या आयुष्यातील वाटचालीत आपला रंगांशी खूपच जवळचा संबंध येतो. आपल्या प्रत्येक कृतीत रंग हे असतातच. कधी ते दिसतात तर कधी दिसत नाहीत. पण त्याचे असित्व आपल्याला जाणवत राहते.
तरुणपणी प्रेमात पडल्यावर गालावर गुलाबी रंग पसरतो. तर लहानपणी अभ्यास न केल्याबद्दल गुरुजींनी गालावर उमटवलेल्या पाच बोटात लाल रंग उधळतात. रागाने आपण लाल होतो ते वेगळेच. दुसर्याचा उत्कर्ष बघून आपला चेहरा काळा टिक्कर पडतो. आपल्यावर दु:खाचे प्रसंग येतात तेव्हा आपल्या डोळ्यासमोर अंधारी येते.
रंग व आपले आयुष्य याचे जवळचे नाते आहे. वेगवेगळ्या रंगांच्या बाटलीतील पाणी आरोग्यासाठी उपयोगी पडते. पण हा माझ्या लेखाचा विषय नाही.
आपण सर्वं जण रंगाशिवाय जगूच शकत नाही. बिन रंगाचे विश्व असूच शकत नाही. असो.
आज मी सफेद रंगाबद्दल बोलणार आहे. गोऱ्या रंगाचे आकर्षण बऱ्याच लोकांना असते.
सौंदर्य हा शब्द आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. हा शब्द समोर आला कि प्रथम आठवते ती जाहिरात आणि ती स्री. सौंदर्य वाढविण्याच्या जाहिरातींचा रतीब TV वर चालू असतो. केसांचे सौंदर्य, त्वचेचे सौंदर्य, चेहऱ्याचे सौंदर्य, डोळ्यांचे सौंदर्य, दातांचे सौंदर्य असे बरेच प्रकार ह्या जाहिरातीत असतात. प्रत्येक वेळी एखादी सुंदर स्री, ती जाहिरात करत असते.
सौंदर्य निरखायचे असेल तर आरसा हवाच. Beauty is not what your see in the mirror,. सौंदर्य म्हणजे नितांत गोरी त्वचा नव्हे. मला अपेक्षित आहे ते मनाचे सौंदर्य, निसर्गाचे सौंदर्य, वर्तणुकीचे सौंदर्य, विचारांचे सौंदर्य, श्रमांचे सौंदर्य इत्यादी. हि वेगवेगळी सौंदर्य स्थळे शोधण्यासाठी आपली जडण घडण तशी असणे आवश्यक आहे. आपल्यावर कसे संस्कार केले जातील हे कदाचित आपल्या हातात नसेल. पण शिक्षणाने , अनुभवाने, चुकीचे संस्कार आपण पुसू शकतो. ती सौंदर्यदृष्टी आपल्याला चांगला माणूस बनण्यासाठी मिळवावीच लागेल.
काय पटतोय का माझा विचार? मला कोणाला दोष देयचा नाहीये. आपण जेव्हा कोणाला भेटतो तेव्हा आपण खरेतर त्या माणसाच्या शरीराला भेटत असतो. आपल्या मनात त्याच्या दिसण्यावरून 'ग्रह' तयार झालेले असतात व आपण सहजपणे त्या माणसाची वर्गवारी करून मोकळे होतो. खरेतर समोरचा माणूस हि आपल्याला भेटल्यावर हेच करत असतो. परंतु आपण जेव्हा त्या माणसाला वारंवार भेटतो, तेव्हा आपले लक्ष शारीरिक गोष्टी वरून वैचारिक बैठकीकडे वळते. अधिक विवेचनासाठी माझा लेख 'सौंदर्य' वाचवा . लिंक: http://bit.ly/i6ZCHn
एवढ्या प्रस्तावानेनंतर आता मुख्य विषयाला सुरवात करतो. गोऱ्या त्वचेचे आपल्याला आकर्षण असते. पण जेव्हा एखाद्याच्या तोंडावर, शरीरावर आपल्याला लहान, मोठा पांढरा डाग दिसतो, तेव्हा मात्र आपण त्या माणसाला टाळतो किवा काही तरी बोलून त्याचे वैगुण्य दाखवितो. खरेतर तो माणूस आधीच काळजीत असतो. तो पण माणसांना टाळायचा प्रयत्न करत असतो. मनाने खचलेला असतो. ह्याचा विचार न करता आपण मात्र त्याला दुखवित असतो.
मित्रानो कृपा करून असे करू नका.
ह्या रोगाचे नाव आहे -- सफेद डाग, श्वेत कुष्ट. इंग्लिश मध्ये ह्या रोगाला Leucoderma or Vitilago असे म्हणतात.प्रत्यक्षात कुष्ट रोगाशी ह्याचा अकारण संबंध जोडला जातो. माणसाचा रंग त्वचेतील Melanin या द्रव्यां वर अवलंबून असते. ह्या Melanin चे प्रमाण शरीरातील एका भागातील खूप कमी झाले तर तो भाग पांढरा दिसतो. बरेच वेळा पोटातील जंता मुळे सुद्धा हा पांढरा डाग येतो.
हा रोग नियमित औषधाने बारा होतो. हा रोग पूर्णपणे अनुवांशिक नाही , तसेच सांसर्गिकही नाही.
मित्रानो, प्रत्येक माणसात देवाने काहीना काही व्यंग निर्माण केलेले असते. काही व्यंग दिसतात तर काही दिसत नाहीत. म्हणजे ती व्यंगे नसतात असा अर्थ होत नाही. म्हणूनच मी तुम्हाला तुमची सौंदर्य दृष्टी सुधारण्यासाठी माझा लेख सौंदर्य वाचायची परत एकदा विनंती करत आहे. जमल तर अश्या माणसाला मदत करा, पण त्याचे वैगुण्य दाखून त्याला दुखाऊ नका. मित्रानो कराल ना एवढे?
सुधीर वैद्य