१२१ / मागणे (Request / Demand )
सकाळी फिरायला जायच्या आधी नेहमीप्रमाणे Radio ऐकत होतो. लोकांना प्रश्न विचारला जात होता कि ह्या वर्षी तुम्ही गणपतीकडे काय मागणार? लोक उत्साहानी उत्तरे देत होती. उत्तरांत खूपच विविधता होती. प्रतेय्क जण स्वतः साठी काही तरी मागत होता. काही लोक देशासाठी शांतता व समृद्धी मागत होते. मी Radio बंद करून फिरायला गेलो पण तो विषय काही मनातून जात नव्हता.
आपण सर्व जण लहानपणापासून दुसरयाकडे काही तरी मागत असतो. वयानुसार ह्या मागण्या आणि मागण्या पुरवणारी माणसे बदलत असतात. जेव्हा आपण मागण्या पुरवण्याच्या वयाचे होतो तेव्हा आपण नेमके काय करतो ह्याचा विचार केला पाहिजे. अधिक विवेचनासाठी माझा लेख सेवा आणि सेवा साधने http://bit.ly/rmigI4 ह्या लिंक वर वाचावा.
माझे असे मत आहे कि देवाकडे मागून प्रत्येक गोष्ट मिळत नाही व न मागताहि ती गोष्ट मिळाल्याशिवाय राहत नाही. हे तुमच्या प्रयत्नांवर व नशिबावर अवलंबून असते. आपण प्रामाणिकपणे व आपल्या कुवतीनुसार काम करायचे आणि मिळणारे फळ स्वीकारायचे. कोणत्याही गोष्टीचा स्वीकार हे मन:शांती च्या वाटेवरील पहिले पाऊल असते. अधिक विवेचनासाठी माझा लेख ABJ/TTP-P Technique http://bit.ly/qPIkoQ ह्या लिंक वर वाचावा.
आपल्याला जे हवे ते मिळेल याची शाश्वती नाही. त्यामुळे जे मिळेल त्यावर प्रेम करायला शिका. आपला पाण्याचा ग्लास अर्धा भरलेला आहे कि अर्धा रिकामा आहे हे तुम्हीच ठरवा. सकारात्मक दृष्टीकोना ने Problem कडे बघा. माझा लेख Thank God ह्या लिंक वर वाचा. http://bit.ly/h0YzXp
सुख आणि दु:ख हे निसर्गाचे चक्र आहे. कठीण प्रसंगाचा सामना करायला शिका. संकटाकडे बुद्धीजीवी होऊन बघा. हात पाय गाळुन कर्मकांडात अडकू नका. कोणत्याही Problem चा तुम्ही स्वतः चांगला मुकाबला करू शकता. आत्मविश्वास नसेल तर Consultant चा सल्ला घ्या. अधिक विवेचनासाठी माझा लेख Consultant http://bit.ly/e0SRzW ह्या लिंक वर वाचावा.
Problem कसा सोडवावा यासाठी काही Tips ह्या लिंक वर http://bit.ly/mVT9cf दिल्या आहेत.
वरील विवेचन वाचून तुम्हाला curiosity असेल कि माझे व देवाचे कसे नाते आहे. माझा लेख My God ह्या लिंक वर वाचा http://bit.ly/griwyG
व तुम्हीच ठरवा आमच्या नात्याबद्दल.
माझा बालपणीचा काळ खूप कठीण होता. मी नेहमी देवाकडे एकच मागणे केले कि हा जो कठीण काळ माझ्या नशिबात आहे त्याला तोंड देण्यासाठी मला शक्ती दे. भोग हे भोगूनच संपवावे लागतात हे मला बालपणीच उमगले. माझे बालपण कधी संपले ते मला कळलेच नाही. मला बालपण होते का? असो.
मागणे ह्या शब्दाचा आवाका एवढा मोठा आहे कि लेख फारच लांबला ह्याची मला जाणीव आहे. तुम्हाला जेव्हा पुरेसा मोकळा वेळ व मानसिक शांतता असेल तेव्हाच हा लेख वाचावा अशी माझी विनंती आहे.
मग मित्रानो, तुम्ही काय मागणार गणपती बाप्पा कडे ? मला जरूर कळवा.
सुधीर वैद्य